For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर

06:21 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर
Advertisement

6 ते 11 जुलैदरम्यान इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला भेट देणार 

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 11 जुलै दरम्यान इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी केली. या दौऱ्याचा उद्देश या तीन देशांसोबत भारताचे सामरिक, आर्थिक आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा असल्याचे परराष्ट्र व्यवहार सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितले. पंतप्रधान आपल्या दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून करतील. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहेत. मेलबर्नमध्ये आयोजित द्विपक्षीय बैठकांमध्ये उपस्थित राहिल्यानंतर दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात न्यूझीलंडला पोहोचतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंडचा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरेल. जवळपास 40 वर्षांत प्रथमच एखादे भारतीय पंतप्रधान अधिकृत दौऱ्यावर न्यूझीलंडला भेट देणार आहेत. यापूर्वी, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची घोषणा केली होती. भारत हा जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून न्यूझीलंडच्या आर्थिक समृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार

भारत आणि न्यूझीलंडने यावर्षी वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या तीन देशांच्या दौऱ्यात व्यापार, गुंतवणूक, सामरिक सहकार्य, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भागीदारी आणि विविध द्विपक्षीय मुद्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची अपेक्षा

Advertisement
Tags :

.