For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान उद्यापासून विदेश दौऱ्यावर

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान उद्यापासून विदेश दौऱ्यावर
Advertisement

उझबेकिस्तान, किर्गिस्तानला भेट देणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पंतप्रधान मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानला भेट देणार आहेत. ते 29-30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तानच्या द्विपक्षीय दौऱ्यावर असतील, तर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान किर्गिस्तानमध्ये होणाऱ्या 26 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होतील. उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तानला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्तरावर व्यापक आणि अर्थपूर्ण संवाद सुरू आहे. भारत आणि उझबेकिस्तानने 2011 मध्ये आपले संबंध सामरिक भागीदारीपर्यंत उंचावले. तेव्हापासून, दोन्ही देशांचे संबंध अनेक क्षेत्रांमध्ये सातत्याने मजबूत झाले आहेत. उझबेकिस्तानच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे पोहोचतील. तेथे ते 26 व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.