कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इंडिगो‘तील गोंधळाचा पंतप्रधानांकडून आढावा

06:19 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध प्रशासकीय विभागांची घेतली बैठक

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने इंडिगो गोंधळ प्रकरणाचा आढावा घेतला आहे. यासाठी दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील अधिकारी, नागरी विमान वाहतूक विभागाचे अधिकारी, तसेच डीजीसीए आणि एएआय यांचे अधिकारी यांची एकत्र बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीत सहभागी झाले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचना केल्या.

मंगळवारी इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी नागरी विमानवाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन चर्चा केली होती. बैठकीसाठी एल्बर्स यांना नागरी विमानवाहतूक विभागाने पाचारण केले होते. इंडिगोने आपल्या सर्व मार्गांवरील विमान उ•ाणांमध्ये 10 टक्के कपात करावी, असा आदेश कंपनीला देण्यात आला आहे. तसेच सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे त्वरित परत द्यावेत, असा आदेशही या कंपनीला देण्यात आला आहे. प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याच्या प्रकरणी एल्बर्स यांनी त्यांची क्षमायाचना केली.

उड्डाणे कमी करण्याचा निर्णय

गेले दहा दिवस इंडिगोच्या विमानसेवेचा गोंधळ चाललेला आहे. या कालावधीत कंपनीने किमान 3 हजार विमान उ•ाणे रद्द केली आहेत. त्यामुळे भारतातील अनेक विमानतळांवर लक्षावधी प्रवाशांना अनेक तास अडकून पडावे लागले होते. अद्यापही कंपनीची विमानसेवा पूर्वपदावर आलेली नाही. मात्र, ती लवकरच सुरळीत होईल, असे प्रतिपादन एल्बर्स यांनी केले आहे. कंपनीने सेवा स्थिरस्थावर होण्यासाठी आपली 400 ते 500 उ•ाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

72 तास आधी सूचना अनिवार्य

विमान उ•ाण रद्द होणार असेल, तर तशी सूचना त्या विमानातून प्रवास करणार असणाऱ्या प्रवाशांना किमान 72 तास आधी देणे अनिवार्य आहे. तथापि, इंडिगोच्या व्यवस्थापनाने या नियमाचे पालन गेले 10 दिवस केलेले नाही. अनेक तांत्रिक अडचणींमुळे या नियमाचे पालन करणे शक्य झाले नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. या प्रकरणी सरकार या कंपनीकडून माहिती घेत आहे.

अधिक तिकिटविक्रीमुळे गोंधळ?

कंपनीने काही दिवसांपूर्वी मोठा डिस्काऊंट देऊन अनेक तिकिटांची विक्री केली असल्याचे उघड होत आहे. यामुळे कंपनीला विमान उ•ाणांची संख्या वाढवावी लागली. परिणामी, प्रचंड गोंधळ निर्माण झाला, असेही अनेक तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कंपनीला 10 टक्के विमान उ•ाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, कंपनीने 20 टक्के उ•ाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा स्थिरस्थावर होईपर्यंत हा निर्णय लागू राहील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

प्रतिदिन 1,800 उड्डाणे

मंगळवारपासून कंपनी प्रतिदिन 1,800 उड्डाणे करत आहे. ही संख्या यापूर्वीच्या 2,200 ते 2,300 पेक्षा 400 ते 500 ने कमी आहे. उ•ाणांची संख्या कमी केल्याने सेवा सुरळीत होऊ लागली असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ही सेवा पूर्णत: व्यवस्थित होईल, असा विश्वास कंपनीने बुधवारी व्यक्त केला आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article