पंतप्रधान देशाचे कि गुजरातचे ? देश इतका कुमकुवत आहे काय ? उद्धव ठाकरे यांचा सवाल
देश इतकाही कुमकुवत नाही. देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या पदाची आठवण नेहमी करून द्यावी लागते. ते कधी काळी गुजरातचे मुख्यमंत्री होते पण सध्या ते देशाचे पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधांनांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याची टिका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल सुरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतचा विकास झाला तर गुजरातचा विकास होईल आणि गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. अस विधान केलं होतं. त्यावरून देशभरात विरोधकांकडून टिका होत आहे.
सूरत डायमंड बोर्सचे काल (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना सुरतचा विकास झाला तर गुजरात राज्याचा विकास होईल आणि गुजरात राज्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असे विधान केले. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विधानाचा निषेध केला. आज विधीमंडळाबाहेर माध्य़मांशी बोलताना ते म्हणाले, "मुंबईतील हिरे बाजार सूरतला नेल्याचं दुख नाही...पण खेद आहे. मुंबईत व्यापारी बांधवांचा जो व्यवसाय सुरू होते, ते उठवून सूरतला नेण्यात आले. काल देशाचे पंतप्रधान म्हणाले की गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, देश काय एवढा कमकवूत आहे का ? पंतप्रधांना आठवण करून देतो की ते देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही कधी काळी गुजरातचे मुख्यमंत्री होता, त्यावेळी असे बोलला असतात तर ठिक होतं. परंतु, देशाचे पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा शोभून दिसत नाही” असा उपरोधात्मक टिका उद्धव ठाकरे यांनी केली.