For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलॉन मस्कसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रेड कार्पेट

06:47 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
एलॉन मस्कसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रेड कार्पेट
Advertisement

तिसऱ्या आठवड्यातील भेटीचे औत्सुक्य ? कारखान्यासाठी अनेक राज्यांचा आग्रह : निवडणूक धामधुमीत भेटीमुळे चर्चा रंगतेय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेतील टेस्ला या जगप्रसिद्ध कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे येत्या 22 तारखेला भारत भेटीवर येत असून या भेटीकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असून या अंतर्गत भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासंदर्भातल्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप मिळणार असल्याचे समजते.

Advertisement

ही राज्ये आघाडीवर

टेस्ला ही कंपनी आगामी काळामध्ये भारतातच इलेक्ट्रीक कार उत्पादन कारखाना उभारणार असून यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान मस्क यांच्या भेटीआधीच कारखाना स्थापन करण्यासाठी

विविध राज्य सरकारांनी आता पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांनी आपल्याच राज्यामध्ये कारखाना सुरू करावा यासाठी अनेक राज्यांनी तगादा लावला आहे. यामध्ये गुजरात, तामिळनाडू, तेलंगाना आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान या राज्यांनी जगप्रसिद्ध उद्योगपती मस्क यांच्याशी संपर्क साधल्याचेही बोलले जात आहे.

भेटीचे औत्सुक्य

दरम्यान टेस्लाचे एलॉन मस्क 22 एप्रिलला भारतात दाखल होणार आहेत. टेस्लाचे सर्वेसर्वा मस्क हे आपल्या सहकाऱ्यांसोबत भारत भेटीवर येत असून याबाबत आता उत्सुकता अधिकच ताणली गेलेली आहे. टेस्ला कंपनीचा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कारखाना भारतामध्ये सुरू केला जाणार असून त्यासाठी सरकार त्यांना जागा उपलब्ध करून देणार असल्याचे समजते. या नवीन कारखान्या अंतर्गत टेस्लाने 200 ते 300 कोटी डॉलरची रक्कम गुंतवण्याचे निश्चित केले असल्याचे बोलले जात आहे.

 आयात करात सूट

भारत सरकारने अलीकडेच भारतात उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांना आयात करामध्ये सवलत देण्याची घोषणा केली आहे. ही आयात सूट इलेक्ट्रिक वाहन संदर्भात असल्याची माहिती आहे. या बातमीनंतर टेस्ला कंपनीकडून भारतामध्ये कारखाना स्थापन करण्यासंदर्भातल्या हालचालींनी अधिक वेग घेतला आहे. मस्क यांच्या भारत भेटीबाबत अनेक तर्कवितर्क केले जात असले तरी गेल्या काही कालावधीमध्ये कंपनीला चीनमधल्या स्थितीमुळे इतरत्र स्थलांतर करण्याचा पर्याय मस्क यांना शोधावा लागत आहे. यात भारत हा देश मस्क यांना अधिक आशावादी वाटतो आहे.

का भारतावर लक्ष

दुसरीकडे अलीकडच्या काळामध्ये जागतिक स्तरावर टेस्लाच्या विक्रीमध्ये घट दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये टेस्लाच्या वाहन विक्रीमध्ये साडेआठ टक्के घट झाली आहे. 3 लाख 86 हजार 810 वाहनांची विक्री टेस्लाने पहिल्या तिमाहित केली आहे. चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांची कडवी टक्कर मस्क यांना द्यावी लागते आहे. शिवाय कार विक्रीच्या तुलनेत इतर देशांच्या यादीत पाहता भारत हा तिसरा मोठा देश आहे. म्हणूनच टेस्लाने आता आपले लक्ष भारतावर केंद्रीत केले आहे.

Advertisement
Tags :

.