पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पहाटे तिरुपती बालाजी मंदिरात व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यंकटेश्वराची विधीवत पूजा केली. यावेळी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी त्यांच्यासोबत होते.यासंबंधीचे फोटो मोदींच्या अधिकृत x अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले की, '१४० कोटी भारतीयांच्या समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना केली.'लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचले.तिरुमला दौऱ्यानंतर पंतप्रधान तेलंगणात पुन्हा प्रचार करणार आहेत.यानंतर ते हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. तिथे दोन जाहीर सभा आणि मेगा रोड शो करणार आहेत.तीन दिवसांच्या तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदी हैदराबादमध्ये रोड शो करणार आहेत.कोरोनानंतर पहिल्यांदाच मोदी बालाजीच्या दर्शनासाठी गेले आहेत.
रविवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचले, जेथे त्यांचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदी रात्री 8 वाजता तिरुपतीजवळील रेनिंगुट्टा विमानतळावर उतरले.