For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला श्रीपादभाऊंच्या कार्याचा गौरव

12:06 PM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला श्रीपादभाऊंच्या कार्याचा गौरव
Advertisement

प्रत्येक बूथ जिंकण्याचे कार्यकर्त्यांना केले आवाहन

Advertisement

पंतप्रधान पत्रात म्हणतात...

  • भाजपा, देशासाठी समर्पित कार्यकर्ता
  • जमिनीवर पाय असलेला एक नेता
  • देशासह गोव्यासाठी उल्लेखनीय कार्य
  • जनाधारामुळे पुन्हा पोहोचणार संसदेत
  • भाजपाचे प्रत्येक मत देशाच्या मजबुतीसाठी

पणजी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांना त्यांच्या कार्याचा गौरव करणारे व त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीबद्दल शुभेच्छा देणारे पत्र पाठविले आहे. या पत्रात नरेंद्र मोदी म्हणतात, भारतीय जनता पार्टीचे एक समर्पित कार्यकर्ता म्हणून नेहमी आपणाला अपार कष्ट घेताना मी पाहिले आहे. केंद्र सरकारमध्ये माझे एक महत्त्वाचे व एक अनुभवी सहयोगीच्या ऊपात विविध योजनांद्वारे देशवासियांना जोडण्यात आणि गोव्यासहीत देशभरात पर्यटन क्षेत्राला मजबुती देण्यासाठी आपण केलेले कार्य उल्लेखनीय असेच आहे.

Advertisement

 जमिनीवर पाय असलेला नेता

नेहमी पाय जमिनीवर असलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या ऊपात आपले लोकांशी घनिष्ट नाते आहे. गोव्यात भाजपा मजबूत करण्यात आपले मोठे योगदान आहे. उत्तर गोवा लोकसभा क्षेत्रात आपण केलेली विकामकामे आणि तिथल्या लोकांच्या सेवेप्रति आपण करीत असलेले प्रयत्न आपणास नवीन उंची प्राप्त करून देणारे आहे.

पुन्हा संसदेत पोहोचणार

पंतप्रधान पत्रात पुढे म्हणतात, मला विश्वास आहे की आपण जनता जनार्दनाचे खूप आशीर्वाद घेऊन संसदेत येणार आहात. आम्ही सगळे मिळून देशवासियांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करूया. आपणासारखे ऊर्जावान साथी संसदेत मला बळ देतील.

 ही निवडणूक सामान्य नाही

आपल्या लोकसभा क्षेत्रातील मतदारांना आणि कार्यकर्त्यांना विनम्रपणे सांगू इच्छितो की ही निवडणूक सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक काँग्रेसच्या पाच-सहा दशकांच्या राजवटीत आमच्या कुटुंबांनी आणि कुटुंबातील बुजूर्गांनी जे कष्ट उपसले आहेत, त्यातून मुक्ती मिळवून देणारे महत्वपूर्ण क्षण आहे. गेल्या दशकात समाजाच्या प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणताना देशवासियांना अनेक अडचणीतून बाहेर काढले गेले आहे.

भाजपाचे प्रत्येक मत देश मजबुतीसाठी

भाजपाला मिळणारे प्रत्येक मत एक मजबूत देश बनविण्यात आणि 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनविण्याच्या प्रयत्नांना गती देणारे आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात उत्साहपूर्वक कल हे सांगत आहे की या निवडणुकीत जनतेने आमच्या ‘विजन‘ला समर्थन देण्याचा ठाम निश्चय केलेला आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

विघटनवादी काँग्रेसला रोखायला हवेच

या व्यतिरिक्त काँग्रेस आणि त्यांच्या इंडी सहयोगींच्या विघटनवादी आणि भेदभावपूर्ण उद्देशांविऊद्ध मतदारांना जागृत करण्याचा मी आग्रह करतो आहे.  एससी, एसटी आणि ओबीसी समाजांचे आरक्षण हिरावून आपल्या वोटबँकेला देण्याचा त्यांचा डाव आहे, भलेही धर्माच्या आधारावर आरक्षण असंवैधानिक आहे. लोकांच्या कष्टाची कमाई ते त्यांच्या वोटबँकेला देण्यासाठी टपलेले आहेत. काँग्रेसने हेही स्पष्ट केलेले आहे की ते ‘वारसा कर‘ सारख्या धोकादायक विचारांचे समर्थन करणार आहे. त्यांच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी देशाला एकत्र यावेच लागेल, असे पत्रात पुढे नमूद केलेले आहे.

उन वाढण्याच्याआधी सकाळी मतदान करावे

या दिवसांत उकाडा प्रचंढ वाढलेला आहे आणि लोकांच्या अडचणी मी पुरेपूर जाणून आहे. परंतु ही निवडणूक देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. यासाठी मी लोकांना विनंती करू इच्छितो की उन वाढण्याच्या आधी मतदान केंद्रावर जाऊन सकाळी-सकाळी मतदान करावे. आमच्या कार्यकर्त्यांनी मोठा संख्येने लोकांना बाहेर काढून मतदान करायला प्रोत्साहित करत बूथ जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे. लोकसभा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी प्रत्येक बूथवर विजय निश्चित करण्यावर भर द्यावा. मतदारांना माझ्यावतीने गॅरेन्टी द्यावी की मोदींचा प्रत्येक क्षण न् क्षण देशवासियांच्या नावावर आहे. निवडणुकीत आपल्या विजयासाठी माझ्या शुभेच्छा, असे मोदी पत्रात शेवटी म्हणत आहेत.

Advertisement
Tags :

.