महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा; समरजितसिंह घाटगे यांचे आवाहन

03:08 PM Apr 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

वाळवे खुर्दमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात

बिद्री : विकसित भारताचे स्वप्न घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या स्वप्नातील बलशाली भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठीमहायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा विजय आवश्यक आहे.ठ असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

Advertisement

वाळवे खुर्द(ता.कागल)येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ स्व.हिंदूराव पाटील सभागृहात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. घाटगे म्हणाले, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापूरमध्ये जंगी सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असणे आवश्यक आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनी यासाठी नियोजन करावे. असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

बिद्रीचे माजी उपाध्यक्ष व दूध साखर बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी देणे ही देशाची गरज आहे .कागल तालुक्यात तीन प्रमुख गट एकत्र आले आहेत. त्यामुळे कागल तालुक्याची ताकद उच्चांकी मताधिक्याच्या माध्यमातून दाखवून देऊया.

यावेळी सदा साखरचे संचालक आनंदराव फराकटे, मसू पाटील, उपसरपंच भरत पाटील, हनुमंत सुतार, नंदकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, तालुकाध्यक्ष उत्तम पाटील, दिनकर शेणवी, संदेश पाटील, संभाजी फराकटे, विष्णू पाटील, शहाजी गायकवाड, मेहबूब शाणेदिवान, सागर फराकटे, संतोष गायकवाड, यशवंत आळवेकर, दिनकर शिंदे आदी उपस्थित होते. स्वागत बाळासाहेब पाटील यांनी केले.आभार यशवंत शेणवी यांनी मानले.

Advertisement
Tags :
Prime Minister Narendra Modi
Next Article