For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन

06:32 AM Jan 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन
Advertisement

दिल्ली येथील भारत मंडपम सहा दिवस चालणार सोहळा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील वाढता मध्यमवर्ग, जलद शहरीकरण आणि परवडणारी वाहने भारतातील वाहन क्षेत्राला चालना देतील. भारतात बॅटरी स्टोरेज सिस्टीममध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 च्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. यासोबतच आपला देश अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त कार विकतो असे उद्गारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले आहेत.

Advertisement

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 शुक्रवार 17 पासून सुरु झाला असून तो 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी  पंतप्रधान मोदीं यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. भारतात कार खरेदी न करण्याचे एक कारण म्हणजे चांगले आणि रुंद रस्ते नसणे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी राखून ठेवण्यात आला होता अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली आहे.

जवळपास पुढील सहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि परदेशातील 34 ऑटोमोबाईल कंपन्यांच्या 100 हून अधिक वाहनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सर्वसामान्यांसह अन्य उद्योग क्षेत्रातील दिग्गजांसाठी 22 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पोचे दरवाजे खुले राहणार आहेत. यामध्ये वाहन प्रमींना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्सची मॉडेल्स पहाता येणार आहेत. तसेच  यामध्ये ऑटो एक्स्पोच्या ठिकाणी असणाऱ्या नकाशाचा आधार घेत आपल्या पसंतीच्या कंपनीचा स्टॉल कुठे आहे ते तपासून भेट देण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या वर्षी भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगात वार्षिक 12 टक्के वाढ झाली आहे आणि भारताची निर्यातही वाढली आहे. तसेच भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. कल्पना करा जेव्हा भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, तेव्हा भारताची ऑटो मार्केट कुठे असेल? विकसित भारताचा प्रवास म्हणजे गतिशीलता क्षेत्राचा अभूतपूर्व विस्तार भविष्यात राहणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

एक्स्पोमध्ये पहिली इलेक्ट्रिक कार इव्हिटारा लाँच

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार इव्हिटारा ऑटो एक्स्पोमध्ये लाँच, करण्यात आली. यामध्ये 500 किमी रेंज, दोन बॅटरीही देण्यात आल्या आहेत.  मारुती सुझुकी इंडियामध्ये सुमारे 58 टक्के हिस्सा असलेल्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने भारताला या मॉडेलसाठी जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची योजना आखली आहे. मारुती इंडियाने शुक्रवारी त्यांची पहिली बॅटरी इलेक्ट्रिक कार इव्हिटारा सादर केली, जी 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ तोशिहिरो सुझुकी यांनी सांगितले की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही युरोप आणि जपानसह इतर प्रदेशांमध्ये निर्यात केली जाणार असल्याचेही म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.