महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी यांचे अबुधाबीत स्वागत

06:56 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय नागरीकांमध्ये जल्लोष, आज करणार मंदिराचे उद्घाटन, कतारचाही दौरा करणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

संयुक्त अरब अमिरातीतील एक देश अबुधाबी येथे साकारण्यात आलेल्या भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन आज बुधवारी होणार आहे. हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी त्यांचे अबुधाबीत आगमन झाले असून तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. या देशात भारतीय मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करुन आनंद व्यक्त केला आहे.

या देशात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल् निहयान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती या विषयांवर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. नंतर दोन्ही नेत्यांनी युनिफाईट पेमेंट इंटरफेस (युपीआय) चा प्रारंभ या देशात केला. आता ही भारतीय देय व्यवस्था फ्रान्ससह सहा देशांमध्ये लागू करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

भव्य मंदिराचे उद्घाटन आज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथे साकारण्यात आलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन आज बुधवारी होणार आहे. हे मंदिर अतिभव्य असून हिंदू संस्कृती आणि धर्मशास्त्राच्या नियमानुसार बांधण्यात आले आहे. या मंदिरासाठी भूखंड अबुधाबीच्या सरकारनेच दिला आहे. हे संयुक्त अरब अमिरात आणि अबुधाबी येथे निर्माण करण्यात आलेले प्रथमच हिंदू मंदिर आहे.

उद्घाटनासाठी उत्सुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारलेल्या भव्य राममंदिरात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर आता त्यांच्याच हस्ते अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. मी या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी अत्यंत उत्सुक असून हा सन्मान मला मिळत आहे, हे माझे परमभाग्य आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी अबुधाबीत आल्यानंतर काढले.

‘अहलान’ कार्यक्रमाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी येथील भारतीय समाजाने ‘अहलान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यांनीही या कार्यक्रमात भाषण करुन भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या संबंधांवर भाष्य केले. येथील भारतीय लोकांनी या भागाच्या आर्थिक प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. जगात सर्वत्र पोहचलेल्या भारतीय वंशाच्या नागरीकांनी त्यांच्या कष्टांनी आणि बुद्धीमत्तेने भारताची मान उंचावली आहे, अशी भलावण त्यांनी केली. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाचेही कौतुक केले. भारत आणि अमिरात यांच्यातील संबंध भविष्यकाळात अधिकाधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम भारत आणि अमिरात यांच्यातील संबंधांच्या वृद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया तेथील मान्यवर भारतीयांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला संयुक्त अरब अमिरातीच्या प्रत्येक देशातून लक्षावधी नागरीकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवत भारताचा जयजयकार केला.

पंतप्रधान मोदी यांचा जयजयकार

अबुधाबीत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जसा शासकीय सन्मान करण्यात आला, तसाच येथील भारतीय समाजाकडूनही करण्यात आला आहे. या देशात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article