For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांची अणुकेंद्राला भेट

06:15 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांची अणुकेंद्राला भेट
**SCREENSHOT VIA @NarendraModi** Moscow: Prime Minister Narendra Modi being conferred the highest civilian award of Russian Federation, Order of St Andrew the Apostle, by Russian President Vladimir Putin, in Moscow, Russia, Tuesday, July 9, 2024. (PTI Photo)(PTI07_09_2024_000262B)
Advertisement

वृत्तसंस्था / मॉस्को

Advertisement

रशियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील प्रमुख अणुवीज केंद्राला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हेही होते. ‘अॅटम सेंटर’ असे या अणुवीज केंद्राचे नाव आहे. भारत आणि रशिया यांच्यातील प्रगाढ अणुसहकार्याचे प्रतीक म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. भारतात रशियाच्या साहाय्याने अणुवीज केंद्र स्थापन केले जाणार आहे, अशी चर्चा काही काळापासून राजकीय वर्तुळात होती. या चर्चेला या भेटीमुळे बळ मिळाले असून जगाचेही लक्ष या भेटीकडे वेधले गेले आहे.

रशियाच्या या अणुकेंद्रात अणुऊर्जा आणि अणुतंत्रज्ञान या संदर्भात संशोधन आणि विकास कार्य केले जाते. भारतातही अशा प्रकारचे अणुसंशोधन व्हावे, अशी  भारताची इच्छा आहे. त्यादृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. अणुऊर्जेचा उपयोग शांततेच्या कारणासाठी आणि वीजनिर्मितीसाठी व्हावा, अशी भारताची भूमिका आहे. भारताच्या लागून असलेल्या पाकिस्तान आणि चीन या देशांकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे असल्याने भारतालाही अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलावी लागली आहेत. रशियाशी अणुसहकार्य करताना हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे. भविष्यकाळात आर्थिक विकासासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर वीजेची आवश्यकता भासणार आहे. अणुवीज निर्मिती हा भारतासाठी आवश्यक पर्याय ठरु शकतो. भारताने अमेरिकेशीही अणुसहकार्य करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाच्या अणुकेंद्राला भेट हा महत्वाचा संकेत असल्याचे मत राजकीय जाणकारांनी या भेटीनंतर व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.