महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदींचा शनिवारी बेळगावात मुक्काम

01:18 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रविवारी सकाळी 10 वाजता सभा : देवेगौडा, कुमारस्वामी, येडियुराप्पा उपस्थित राहणार

Advertisement

बेळगाव : भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावमध्ये येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात काहीसा बदल करण्यात आला आहे. शनिवारी ते बेळगावमध्ये दाखल होणार असून एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. रविवार दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता ते मालिनी सिटी येथे होणाऱ्या प्रचार लोकसभेला संबोधित करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी गुऊवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 रोजी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याने प्रचार सभा संपून रात्री उशिरा त्यांचे बेळगाव मध्ये आगमन होईल. तर बेळगावमध्ये होणाऱ्या सभेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. मालिनी सिटी येथे होणाऱ्या दुपारी बारा वाजताची सभा आता सकाळी दहा वाजता होणार आहे. या प्रचार सभेला माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, भाजपचे जेष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही

नरेंद्र मोदी हे एनडीए आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. मात्र इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही. अद्यापही इंडिया आघाडी संभ्रमात असल्याने त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याची टीका भाजप प्रवक्त्या मालवीका अविनाश यांनी केली. भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या दक्षिण कर्नाटकातील 14 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी भाजपला उत्तम पाठिंबा मिळाला आहे. तसेच उर्वरित 14 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. येथेही भाजपला पुरक वातावरण आहे. 2014 पूर्वी देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता परंतु मोदी सरकारमुळे भ्रष्टाचार थांबून विकासाची गती वाढली आहे. त्यामुळेच आज देशाचे अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या महानगराध्यक्ष गीता सुतार, हनुमंत कोंगाळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article