For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींचे भाषण लांबणीवर

06:30 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींचे भाषण लांबणीवर
Advertisement

लोकसभेत विरोधकांचा गोंधळ : कामकाज स्थगित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी बुधवारी सायंकाळी 5 वाजता लोकसभेत आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार होते. तथापि, विरोधकांचे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता गुरुवारीच पंतप्रधानांचे उत्तर अपेक्षित आहे.

Advertisement

लोकसभेचे कामकाज बुधवारी सकाळी सुरू झाल्यानंतर सभापती सकाळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर सरकारची बाजू मांडण्यास सुरुवात केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करतो, असे ते सांगत असतानाच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे पुस्तक घेऊन संसदेत आल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. विरोधकांच्या गोंधळामुळे वारंवार कामकाज तहकूब करावे लागले.

गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत गोंधळ सुरू आहे. बुधवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सहावा दिवस होता. आतापर्यंत बराच गोंधळ पाहायला मिळाला आहे. दुपारीही विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गतिरोधादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता लोकसभेला संबोधित करणार होते. मात्र, त्यांचे भाषण होऊ शकले नाही.

लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गोंधळ

संसदेतील कोंडी सोडविण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात बैठक सुरू असताना विरोधी पक्ष आणि भाजप खासदारांमध्ये वादविवाद झाला. कार्यालयातील एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एक महिला विरोधी खासदार केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी जोरजोरात बोलत असल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.