For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींचे कौतुक, कार्ती चिदंबरम यांना पडले महागात

06:05 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींचे कौतुक  कार्ती चिदंबरम यांना पडले महागात
Advertisement

काँग्रेसने पाठविली नोटीस : 10 दिवसांत द्यावे लागणार स्पष्टीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करणे खासदार कार्ति चिदंबरम यांना महागात पडले आहे. काँग्रेस पक्षाने चिदंबरम यांना नोटीस पाठविली असून 10 दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. कार्ति चिदंबरम हे संपुआ सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत.

Advertisement

राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक लोकप्रिय असल्याचे कार्ति यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. हेच वक्तव्य चिदंबरम यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. पंतप्रधान मोदींना राहुल गांधींपेक्षा अधिक लोकप्रिय ठरविल्याप्रकरणी कार्ति यांना तामिळनाडू काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख के.आर. रामासामी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून 10 दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

कार्ति यांनी मुलाखतीत ईव्हीएमवर देखील विश्वास व्यक्त केला होता. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काँग्रेस निवडणूक आयोगाकडे सातत्याने आक्षेप नोंदवत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अलिकडेच ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत आयोगाला पुन्हा पत्र लिहिले आहे.

Advertisement
Tags :

.