महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदी देणार ‘राष्ट्रनिर्मिती पुरस्कार

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : देशातील पहिला वहिला राष्ट्रनिर्मिती पुरस्कार (नॅशलन क्रिएटर्स अॅवॉर्ड) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील भारत मंडपम सभागृहात दिला जाणार आहे. सृजनशीलतेच्या माध्यमातून देशात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचे या पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे. ही माहिती केंद्र सरकारने गुरुवारी प्रसिद्ध केली आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज शुक्रवारी होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पुरस्काराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. केंद्र सरकारने आवेदने पाठविण्याचे आवाहन केल्यानंतर प्रथम टप्प्यातच विविध क्षेत्रांमधून दीड लाख आवेदने प्राप्त झाली आहेत. तर मतदान टप्प्यात 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी मतदान केलेले आहे. या आवेदनांमधून 23 पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून त्यांच्यातील 3 जण आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमधील आहेत. पुरस्कारांसाठी 20 श्रेणींची निवड करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article