महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदींना कुवैतचा सर्वोच्च पुरस्कार

06:59 AM Dec 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑर्डर मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान : आतापर्यंत 20 देशांकडून गौरव

Advertisement

वृत्तसंस्था/ अम्मान

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वोच्च पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींना कुवैतच्या अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-जबर अल-सबा यांनी हा पुरस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार मिळविणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींना कुठल्याही देशाकडून मिळणारा हा 20 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तर भारत आणि कुवैतच्या संबंधांना आता रणनीतिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला आहे.

ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कुवैतचा एक नाइटहुड ऑर्डर आहे. हा कुवैतचा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार मैत्रीचे प्रतीक म्हणून राष्ट्राध्यक्ष आणि विदेशी शासक आणि विदेशी राजघराण्याच्या परिवारांच्या सदस्यांना दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार बिल क्लिंटन, युवराज चार्ल्स आणि जॉर्ज बुश यासारख्या विदेशी नेत्यांना देण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींचे अमीर यांचा महाल बायन पॅलेसमध्ये स्वागत करण्यात आले, जेथे त्यांना गार्ड ऑफ ऑनरद्वारे सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदी शनिवारी दोन दिवसीय कुवैत दौऱ्यावर पोहोचले होते.

भारतीय कामगारांशी संवाद

पंतप्रधान मोदींनी शनिवारी कुवैतमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांशी संवाद साधला आहे. तसेच पंतप्रधानांनी कुवैतमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले आहे. 43 वर्षानंतर भारताचा कुठलाही पंतप्रधान कुवैतमध्ये पोहोचला आहे. कुवैत अन् भारत दरम्यान प्रवासाला केवळ 4 तास लागतात, तर पंतप्रधान दौऱ्यावर येण्यास 4 दशके लागली आहेत. कुवैतमध्ये लोकांना प्रत्येक सण साजरा करण्याची सुविधा असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे. पंतप्रधान मोदींपूर्वी 1981 मध्ये पंतप्रधानपदी राहताना इंदिरा गांधींनी कुवैतचा दौरा केला होता.

कुवैतमध्ये भारतीयत्वाचा तडका

अनेक भारतीय पिढ्यांपासून कुवैतमध्ये राहत आहेत. अनेक लोकांचा जन्म येथेच झाला आहे. दरवर्षी येथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत चालली आहे. या भारतीयांनी कुवैतच्या समाजात भारतीयत्वाचा तडका दिला आहे. भारतीयांनी कुवैतच्या कॅनव्हासवर भारतीय कौशल्याचा रंग भरला आहे. येथे भारताचे टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रेडिशनचा मसाला मिसळला आहे.  भारतीय समुदायाचे डॉक्टर्स, नर्सेस कुवैतच्या वैद्यकीय सुविधांसाठी मोठी शक्ती आहेत. भारतीय शिक्षक कुवैतच्या पुढील पिढीला मजबूत करण्यात सहकार्य करत आहेत. इंजिनियर्स कुवैतच्या नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करत आहेत. कुवैतच्या नेतृत्वासोबत होणाऱ्या चर्चेत ते नेहमीच भारतीयांचे कौतुक करतात. कुवैतचे नागरिक देखील भारतीयांची मेहनत, प्रामाणिकपणा, कौशल्याचा आदर करत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

अनिवासी भारतीयांचे मोठे योगदान

भारत सध्या विदेशातून येणाऱ्या रेमिटेन्सप्रकरणी पहिल्या स्थानावर असून याचे मोठे श्रेय अनिवासी भारतीयांनाच जाते. देशवासीय देखील अनिवासी भारतीयांच्या या योगदानाचा सन्मान करतात. भारत आणि कुवैतचे संबंध संस्कृतींचे, व्यापार-उदिमाचे आहेत. भारत-कुवैत हे देश अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत. आम्हाला केवळ राजनयाने जोडले नसून भूतकाळाने देखील परस्परांना जोडले आहे. एकेकाळी कुवैतमधून मोती, चांगल्या प्रजातीचे अश्व भारतात यायचे. तर भारतातून मसाले, कपडे, लाकूड कुवैतला पाठविण्यात यायचे. भारताच्या दागिन्यांने पूर्ण जगाला वेड लावले असून यात कुवैतच्या मोत्यांचे योगदान आहे असे मोदी म्हणाले.

तंत्रज्ञान अन् मनुष्यबळ भारताकडे

कुवैतचे लोक ज्याप्रकारे न्यू कुवैत साकार करू पाहत आहेत, त्याचप्रकारे भारताचे लोक देखील भारत 2047 निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारत सध्या नवोन्मेषावर भर देत आहे. अर्थव्यवस्था मजबूत करू पाहत आहे. भारताचा कुशल युवा कुवैतला नवी ऊर्जा देऊ शकतो. आगामी अनेक दशकांपर्यंत भारत जगातील सर्वात युवा देश राहणार आहे. अशास्थितीत भारत जगाच्या कौशल्याच्या मागणीला पूर्ण करण्याचे सामर्थ्य राखून आहे. याकरता भारत स्वत:च्या युवांमध्ये कौशल्य विकास घडवून आणतोय. भारताने याकरता 24 देशांसोबत करार केले असल्याचा मोदींनी म्हटले आहे.

जगाच्या विकासाचे केंद्र

भारत जगातील सर्वात डिजिटल कनेक्टेड देशांपैकी एक आहे. छोट्या शहरांपासून गावांपर्यंत प्रत्येक भारतीय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारतात हे आता सामान्य लोकांच्या दैनंदिन गरजेत सामील झाले आहे. भारत सातत्याने डिजिटली स्मार्ट होत आहे, ही तर केवळ सुरुवात आहे, भारत जगाला दिशा दाखविणाऱ्या नवोन्मेषाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.  भारत जागतिक विकासाचे केंद्र असेल. भारत जगाचे ग्रीन एनर्जी हब असेल, फार्मा हब असेल, इलेक्ट्रॉनिक हब असेल, जगातील मोठमोठी आर्थिक केंद्रं भारतात असतील असा दावा मोदींनी केला आहे.

महाकुंभमध्ये सामील व्हा

पंतप्रधान मोदींनी अनिवासी भारतीयांना भारतात येण्यासाठी आमंत्रित पेले. नव्या वर्षाचा पहिला महिना यावेळी अनेक राष्ट्रीय उत्सवांनी युक्त असेल. 10 जानेवारीपर्यंत भुवनेश्वरमध्ये अनिवासी भारतीय दिनाचे आयोजन होईल आणि यात जगभरातून लोक सामील होणार आहेत. प्रयागराजमध्ये महाकुंभचे आयोजन होणार असून 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत ते चालणार आहे. यात सामील होण्यासाठी भारतात या आणि स्वत:च्या कुवैती मित्रांनाही भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवा असे आवाहन मोदींनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article