For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी आजपासून इटली दौऱ्यावर

06:43 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी आजपासून इटली दौऱ्यावर
Advertisement

50 व्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी होणार : तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिलाच विदेश दौरा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, 13 जून रोजी 50 व्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला रवाना होणार आहेत. भारताला आउटरीच कंट्री म्हणून परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आल्याचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. या दौऱ्यात त्यांना शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या इतर जागतिक नेत्यांना भेटण्याची संधीही मिळणार आहे.

Advertisement

जी-7 शिखर परिषद 13 ते 15 जूनदरम्यान इटलीच्या अपुलिया भागातील लक्झरी रिसॉर्ट बोर्गो एग्नाझिया येथे होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे देखील या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

महात्मा गांधींच्या प्रतिमेची तोडफोड

जी-7 परिषदेपूर्वी इटलीत खलिस्तानींकडून घृणास्पद प्रकार

इटलीत होणाऱ्या जी-7 परिषदेपूर्वी खलिस्तानवाद्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचा घृणास्पद प्रकार उजेडात आला आहे. जी-7 बैठकीसाठी पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्याच्या काही दिवस आधी ही घटना घडली आहे. या घटनेचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महात्मा गांधींच्या या पुतळ्याच्या पायाभरणीवर खलिस्तानींनी हरदीप सिंह निज्जरच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिल्या आहेत. इटलीच्या प्रशानसनाने यासंबंधी योग्य पावले उचलत संबंधितांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. तसेच तातडीने पुतळ्याची डागडुजी आणि स्वच्छताही करण्यात आली आहे.

इटलीतील या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, इटलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीचा मुद्दा भारताने उपस्थित केला असून, पुतळ्याची दुऊस्ती करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत आपण इटालियन अधिकाऱ्यांशी बोललो असल्याचे ते म्हणाले. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.