महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

8 जुलैला पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर

06:35 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाश्चिमात्य देशांच्या दबावाला झुगारणार : युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच रशियाचा दौरा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 8 जुलै रोजी पंतप्रधान मोदी हे मॉस्कोच्या दौऱ्यावर असतील, जेथे ते रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. सुमारे 5 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचा रशिया दौरा होत आहे. भारत आणि रशिया यांच्यात कित्येक दशके जुनी मैत्री आहे. तसेच रशिया हाच भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.

पंतप्रधान मोदींचा हा रशिया दौरा एक दिवसाचा असू शकतो. युक्रेन युद्ध आणि दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात तणावादरम्यान भूराजकीय स्थिती वेगाने बदलत आहे. अशास्थितीत पंतप्रधान मोदींचा हा दौरा रशियासोबतचे संबंध वृद्धींगत करणारा ठरू शकतो. तर या दौऱ्याकडे अमेरिका तसेची चीन या दोन्ही देशांची नजर राहणार आहे.

पंतप्रधान मोदी हे केवळ रशियाच्या दौऱ्यावर जात असल्याने तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण यात ब्रिक्स परिषदेला सामील करण्यात आलेले नाही. रशियाच्या कजान येथे ऑक्टोबर महिन्यात ब्रिक्सची परिषद आयोजित होणार आहे. पंतप्रधान मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. तर पुतीन हे सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्रपती झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 2019 मध्ये रशियाच्या ब्लादिवोस्तोक शहराचा दौरा केला होता.

रशियासोबत मैत्री कायम

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीतही भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी केले आहे. अमेरिकेने रशियावर अनेक कठोर निर्बंध लादलेले असताना भारताने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या बिडेन प्रशासनाने भारताला रशियन कच्चे तेल खरेदी न करण्याचा इशारा अनेकदा दिला होता, परंतु मोदी सरकारने या इशाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात नवा उच्चांक गाठत आहे. भारताच्या एकूण कच्चे तेल आयातीचा 40 टक्के हिस्सा आता रशियामधून येत आहे. तर अमेरिकेच्या दबावानंतरही भारत सातत्याने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करत आहे. भारत सातत्याने रशियासोबतचे संबंध मजबूत करत आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याप्रकरणी टीका करण्यास भारताने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. तसेच अलिकडेच स्वीत्झर्लंडमध्ये पार पडलेल्या शांतता परिषदेच्या संयुक्त वक्तव्यावर स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिला होता.

चीनची सतर्क नजर

रशिया आणि चीन यांच्यातील मैत्री नव्या शिखरावर पोहोचली असताना पंतप्रधान मोदींचा हा दौरा होणार आहे. पुतीन यांनी अलिकडेच चीनचा दौरा केला होता. रशिया आणि चीन मैत्रीवर भारत बारकाईने नजर ठेवून आहे. रशियाला स्वत:चा कनिष्ठ भागीदार करण्याचा प्रयत्न चीनने चालविला आहे. तर रशिया भारताला उघडपणे मदत करत स्वत:ची रणनीतिक स्वायत्तता राखू पाहत आहे. याचमुळे पंतप्रधान मोदी हे पाश्चिमात्य देशांच्या विरोधानंतरही रशियाच्या दौऱ्यावर जात असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article