महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर

06:55 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्वाड शिखर परिषदेसह द्विपक्षीय बैठकांना हजेरी लावणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाले. अमेरिकेत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते क्वाड परिषदेला उपस्थित राहतील व संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील. तसेच तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत.

सध्या जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मोठ्या घटना-घडामोडी घडत असताना पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा होत आहे. एकीकडे इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढला आहे, तर दुसरीकडे रशिया आणि युव्रेनमध्ये अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे. याचदरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचले असून यावेळी ते जागतिक नेत्यांची भेट घेऊन विविध विषयांवर वार्ता करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता) फिलाडेल्फियामध्ये दाखल झाले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या विल्मिंग्टन, डेलावेअर येथे पोहोचले असून तेथे दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चा करतील. यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंधांशिवाय उभयतांमध्ये रशिया आणि युव्रेन दौरा आणि संभाव्य शांतता प्रक्रियेवरही चर्चा होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.

भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याबाबतही एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्मयता असून त्याअंतर्गत ग्रुप पॅप्टन शुभांशु शुक्ला एक्सिओम-4 मोहीमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देतील. तसेच, अमेरिका आणि भारत यांच्यात अब्जावधी डॉलर्सच्या 31 प्रीडेटर ड्रोन करारावरही चर्चा होऊ शकते. द्विपक्षीय भेटीनंतर, पंतप्रधान मोदी बिडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत क्वाड समिटला उपस्थित राहतील, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाच्या मेळाव्याला संबोधित करतील आणि मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तिसऱ्या दिवशी, पंतप्रधान 23 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘भविष्यातील शिखर संमेलन’ या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. या शिखर परिषदेची थीम ‘सर्वोत्तम भविष्यासाठी सर्वांचे समाधान’ अशी आहे. या संमेलनात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे मार्गदर्शनही होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनाही भेटणार

पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या निमित्ताने इतर काही जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्मयता आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची लढत कमला हॅरिस यांच्याशी होत आहे.

दौऱ्यामुळे जागतिक संबंध दृढ होणार : मोदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेमुळे दोन्ही नेत्यांना भारत-अमेरिका भागिदारी अधिक दृढ करण्यासाठी नवीन मार्ग ओळखता येतील. भविष्यातील संयुक्त राष्ट्र शिखर परिषद ही जागतिक समुदायाला मानवतेच्या कल्याणासाठी पुढे जाण्याचा मार्ग ठरवण्याची संधी आहे, असे प्रतिपादन मोदींनी या दौऱ्यादरम्यान केले आहे. तसेच अमेरिकेतील भारतीय समुदायाशी तसेच अमेरिकेतील महत्त्वाच्या व्यावसायिक नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी ते उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article