इराणच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदींची चर्चा
06:22 AM Mar 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा निषेध
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांना ईद-उल-फित्र आणि इराणी नववर्ष, नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच दोन्ही नेत्यांनी मध्य-पूर्वेतील सद्यस्थिती आणि अनेक गंभीर सुरक्षा मुद्यांवरही सविस्तर चर्चा केली. संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. प्रादेशिक शांतता हाच जागतिक विकासाचा एकमेव खरा मार्ग असल्याचा संदेशही मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींशी झालेल्या चर्चेवेळी दिला.
Advertisement
Advertisement
