For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युट्यूबवर पंतप्रधान मोदींचे 3 कोटी सब्सक्रायबर्स

06:10 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
युट्यूबवर पंतप्रधान मोदींचे 3 कोटी सब्सक्रायबर्स
Advertisement

ट्रम्प यांच्या तुलनेत 7 पट अधिक फॉलोअर्स

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आणखी एक कामगिरी केली आहे. पंतप्रधान मोदींनी युट्यूबवर 3 कोटी सब्सक्रायबर्सचा आकडा पार केला आहे. हा टप्पा गाठणारे ते पहिले जागतिक नेते ठरले आहेत. जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचे युट्यूबवर सर्वाधिक सब्सक्रायबर्स आहेत. रँकिंगनुसार मोदी हे या श्रेणीत इतर नेत्यांपेक्षा खूपच आघाडीवर आहेत.

Advertisement

याप्रकरणी दुसऱ्या स्थानावर ब्राझीलचे माजी अध्यक्ष जायर बोल्सोनारो असून त्यांचे सब्सक्रायबर्स पंतप्रधान मोदींच्या तुलनेत जवळपास एक-चर्तुथांश आहेत. तर पंतप्रधान मोदींकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत 7 पट अधिक सब्सक्रायबर्स आहेत. भारतात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अद्याप कायम आहे. सब्सक्रायबर्स प्रकरणी पंतप्रधान मोदींकडे राहुल गांधींपेक्षा तीनपट अधिक सब्सक्रायबर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स

पंतप्रधान मोदींच्या इन्स्टाग्राम हँडलने यापूर्वी 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा गाठला होता. ही कामगिरी साध्य करणारे ते पहिले जागतिक नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदी हे 2014 मध्ये इन्स्टाग्रामशी जोडले गेले होते. इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक आहे.

योगी आदित्यनाथांची लोकप्रियता

पंतप्रधान मोदींनंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे 1.5 कोटी फॉलोअर्स आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लूला यांचे 1.4 कोटी फॉलोअर्स तर तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांचे 1.1 कोटी फॉलोअर्स आहेत. तर भारतातील नेत्यांमध्ये इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्या स्थानावर आहेत. योगींचे इन्स्टाग्रामवर 1.6 कोटी फॉलोअर्स आहेत. तर राहुल गांधींचे 1.2 कोटी फॉलोअर्स आहेत.

Advertisement
Tags :

.