For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'सुशासन, विकसित भारताचं स्वप्न...'; पंतप्रधान मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड

04:16 PM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
 सुशासन  विकसित भारताचं स्वप्न      पंतप्रधान मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड
Advertisement

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शपथ घेतील. यादरम्यान आज संसदीय मंडळाच्या बैठकीत एनडीएच्या घटकपक्षातील सर्व नेते उपस्थित होते. सर्व पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुमोदन जाहीर केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाच्या प्रतिमेला डोकं टेकवून नमस्कार केला.  नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, पवन कल्याण यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी मोदींना समर्थन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला अनुमोदन देत नितीश कुमार म्हणाले की, नरेंद्र मोदी दहा वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान झाले याचा आनंद आहे.

Advertisement

NDA parliamentary party meetingपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

  • ही एनडीएची सर्वात यशस्वी आघाडी आहे. या आघाडीने पाच वर्षांचे तिन्ही टर्म यशस्वीपणे पूर्ण केली आहे आणि ही आघाडी चौथ्या टर्ममध्ये पदार्पण करीत आहे. राजकीय तज्ज्ञ मोकळ्या मनाने विचार केला तर एनडीए नेशन फर्स्टच्या प्रती कमिटेड आहे.
  • भारताच्या राजकीय व्यवस्थेत organic alliance आहे. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या अनेक नेत्यांनी जे बीज रोवलं. आम्ही त्याचं सिंचन करीत वटवृक्ष उभा केला आहे. आपल्याकडे अशा महान नेत्यांचा वारसा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.
  • एनडीएच्या लोकांमध्ये सुशासन ही एक सामायिक गोष्ट दिसून येते. एनडीए म्हणताच सुशासन हा पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. आम्ही सर्वांमध्ये केंद्रस्थानी गरीबांचं कल्याण हा मुद्दा राहिला आहे. आम्ही सुशासन केवळ पाहिलं नाही तर जगलं आहे.
  • एनडीएच्या माध्यमातून सरकार काय असतं, सरकार कशासाठी असतं आणि  सरकार कसं काम करतं हे फक्त पाहिलं नाही तर अनुभवता आलं. आतापर्यंत सरकार आणि जनतेत एक मोठी दरी होती. मात्र आम्ही ती पार केली.
  • एनडीए सरकारमध्ये पुढील दहा वर्षात सुशासन, विकास, क्वालिटी ऑफ लाइफ याकडे अधिक लक्ष दिलं जाईल. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी तितकी लोकशाही मजबूत होईल.
  • एनडीएचं सरकार विकासचा नवा अध्याय लिहिणार. सुशासन, जनतेचा वाटा आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करू.
  • संसदेतील कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी माझ्यासाठी समान आहे, त्याचमुळे गेल्या तीस वर्षांपासून एनडीए आघाडी मजबुतीने पुढे वाटचाल करतेय. एकमेकांना सोबत घेण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही.
  • या निवडणुकीत दक्षिण भारतात एनडीएने एक नव्या राजकारणाचा पाया मजबूत केला आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेस शंभरचा आकडा गाठू शकलेली नाही. गेल्या तीन निवडणुकीत त्यांना मिळालेल्या जागा आम्हाला 2024 च्या एकाच निवडणुकीत मिळाल्या आहे.
  • NDA म्हणजे, New India, Devlope India आणि Aspirational India
  • एनडीएने देशाला नेहमीच स्थिर सरकार दिलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीएची ओळख भ्रष्टाचाराची आहे. नाव बदलल्यानंतरही देश त्यांच्या घोटाळ्यांना विसरलेला नाही. एका व्यक्तीला विरोध करण्याच्या नादात देशाच्या जनतेने त्यांना विरोधात बसवलं आहे.
  • लोकशाही आम्हाला सर्वांच सन्मान करण्यास शिकवते. विरोधी पक्षातील निवडून आलेल्यांनाही शुभेच्छा. विरोधी पक्षातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आमच्याविरोधात आहेत, राष्ट्रहिताच्या विरोधी नाही. त्यामुळे ते देशासाठी काम करतील अशी आशा आहे.
  • पंचायत ते पार्लेमेटंपर्यंत नारीशक्तीचा हिस्सा असेल हे आमचं वचन आहे. पुढील काळात संसदेत महिलाची संख्या वाढलेली दिसेल.
  • देश पाचव्या क्रमांच्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आज भारत जगासाठी मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उभा राहत आहे.
  • जग नव्या युगात प्रवेश करतोय. ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो. आता नवं युग सुरू होतंय ते हरित युगं. भारताकडे याचं नेतृत्व करण्याची मोठी संधी आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच राष्ट्र प्रथम ही भावना येते.

Advertisement

Advertisement
Tags :

.