महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान मोदींकडून बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीचे अभिनंदन

10:29 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीचे अभिनंदन केले आहे. त्याने अलीकडेच लाईव्ह बुद्धिबळ रेटिंगमध्ये 2800 एलो रेटिंग स्तर ओलांडून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा एरिगेसी हा सर्वांत तऊण भारतीय आणि महान विश्वनाथन आनंद याच्यानंतरचा देशातील फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. या 21 वर्षीय ग्रँडमास्टरने युरोपियन चेस क्लब कपदरम्यान 24 ऑक्टोबर रोजी हा टप्पा गाठला. अल्कलॉइड संघाचे प्रतिनिधीत्व करताना एरिगेसीने पाचव्या फेरीत रशियन खेळाडू दिमित्री आंद्रेइकिनविऊद्ध पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळताना महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

Advertisement

या विजयाने त्याचे लाईव्ह रेटिंग 2800 च्या पुढेच फक्त नेले नाही, तर हे रेटिंग मिळविणाऱ्या बुद्धिबळ इतिहासातील केवळ 16 खेळाडूंच्या प्रतिष्ठित गटात सामील होण्याबरोबर तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. फ्रेंच ग्रँडमास्टर अलिरेझा फिरोजा याने 18 वर्षे आणि पाच महिने वयावर 2800 रेटिंगचा टप्पा ओलांडणारा सर्वांत तऊण खेळाडू म्हणून विक्रम नोंदविलेला आहे, तर पाच वेळा विश्वविजेता राहिलेला मॅग्नस कार्लसन हा सदर टप्पा गाठणारा दुसरा सर्वांत तऊण खेळाडू आहे. एरिगेसीच्या या यशामुळे जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिबळचे महत्त्व आणखी वाढले आहे.

सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी एरिगेसीच्या कामगिरीचे वर्णन ‘अभूतपूर्व’ असे केले आहे आणि सदर ग्रँडमास्टरची प्रतिभा आणि चिकाटीने देशाला मान मिळवून दिल्याचे नमूद केले आहे. ‘लाईव्ह बुद्धिबळ रेटिंगमध्ये 2800 चा टप्पा ओलांडल्याबद्दल अर्जुनचे अभिनंदन. हा एक अभूतपूर्व पराक्रम आहे. त्याची अपवादात्मक प्रतिभा आणि चिकाटी आपल्या संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. एक महान वैयक्तिक टप्पा गाठण्याशिवाय ही कामगिरी आणखी अनेक तऊणांना बुद्धिबळ खेळण्यासाठी आणि चमकण्यासाठी प्रेरणा देईल. जागतिक मंचावरील त्याच्या भावी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा’, असे मोदींनी त्यात म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article