पंतप्रधानांच्या हस्ते युद्धनौका आणि पाणबुडीचे राष्ट्रार्पण
नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊलः पंतप्रधान
मुंबई
'आयएनएस सुरत' आणि 'आयएनएस निलगिरी' या दोन युद्घनौकांसह 'आयएनएस वाघशीर' पाणबुडीचे राष्ट्रार्पण पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांनी केले. याप्रसंगी अनेक अधिकारी आणि रक्षमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. तर रक्षमंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, नौदलाच्या गौरवशाली इतिहासातील आणि आत्मनिर्भर भारत मोहीमेसाठीचा आजचा दिवस हा अत्यंत मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवी ताकद आणि नवी दृष्टी दिली होती. त्यांच्या पवित्र भूमीवर २१ व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल उचलत आहोत. भारताला एक मोठा सागरी वारसा आहे. दोन्ही युद्धनौकांसह पाणबुडी या भारताची निर्मिती आहेत. समुद्राला सुरक्षित बनवायचं आहे, त्या दृष्टीने काम करुयात. भारतीय नौदल ताकदवान बनत आहे. भारताने सागर हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या ६ व्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याच भाग्य मिळालं,असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. खारघर येथील इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.