For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राथमिक शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांच्याकडून तब्बल १४७ विद्यार्थिनी दत्तक!

प्राथमिक शिक्षक डॉ  चंद्रकांत सावंत यांच्याकडून तब्बल १४७ विद्यार्थिनी दत्तक
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत राज्यात रेकॉर्ड केलेले ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा चौकुळ नं. ५ चे मुख्याध्यापक डॉ चंद्रकांत सावंत यांनी आता चौकुळ जुनियर कॉलेजमधील एक विद्यार्थिनी दत्तक घेत आतापर्यंत तब्बल १४७ विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. या शैक्षणिक कार्याबद्दल डाॅ. चन्द्रकांत सावंत यांचे चौकुळ जुनियर कॉलेजच्यावतीने आभार मानण्यात आले.
डॉ चंद्रकांत सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा ८७ शाळांमधील १४७ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत चार लाख ६१ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १४७ मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच त्यानी पाच वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले. तसेच त्यानी यापूर्वी स्वतः पदरमोड करून शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना वेळोवेळी मदत केलेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे डॉ. चंद्रकांत सावंत यांनी दिव्या गावडे विद्यार्थिनीची यापूर्वीच्या शाळेतील हॉस्टेलची प्रलंबित ५००० रुपये फी भरली. त्यामुळे यासारख्या 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थीनी शालेय प्रवाहात राहण्यासाठी डॉ चंद्रकांत सावंत यांनी ८७ शाळांमधील १४७ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेतले आहे. यावेळी चौकुळ ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विजय पाटील प्रा. राधिका आवटे, प्रा. प्रणिता गावडे, संस्कृती चव्हाण, दिलीप कृष्णा गावडे कु. दिव्या दिलीप गावडे व विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.