पुढील आठवड्यापासून प्राथमिक शाळा सकाळी
सांगली :
ऊष्माघाताचे प्रकार पाहता उन्हाचा कडाका बाढत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक माध्यमाच्या शाळा पुढील आठवडयापासून सकाळ सत्रात भरणार आहेत. याबाबतचा शिक्षण विभागाकडून लवकरच आदेश काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उन्हाचा कडाका बाढू लागला असून सकाळी अकरा वाजल्यापासूनच कडक चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने पारा वाढत आहे. या बाढत्या उन्हामुळे दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. या उन्हाचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
शाळा सकाळ सत्रात भरविण्यााची मागणी पालकांसह शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. याचा विचार करून पुढील आठवडयापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी एक मार्चपासुन शाळा सकाळ सत्रात भरविल्या जातात. यावर्षीही याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाकडून लवकरच घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- शाळा सकाळ सत्रात भरवा
दरम्यान तीव्र उन्हामुळे काही दिवसापूर्वीच एकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ला ताजी आहे. उष्माघातामुळे घडणारे प्रकार पाहता शाळा एक मार्चपासून सकाळ सत्रात भरवा अशी मागणी जुनी पेन्शन (माध्य व उच्च माध्य) संघटनेने शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
उन्हाचा कडाका वाढत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा एक मार्चपासून सकाळ सांगली सत्रात भरवावी अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेच्या बतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन (माध्य व उच्च माध्य) संघटनेकडून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत निवेदन देण्यात आले. सध्या उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे. यामुळे दि.१ मार्च २०२५ पासून सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरणेस परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे मनपा अध्यक्ष इम्रान मुजावर, जिल्हाध्यक्ष बापु दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष लाखन मकानदार, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन इंगोले, जिल्हा सचिव कलीम नदाफ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.