For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात तृतीयपंथियांचा ‘प्राईड वॉक’

10:40 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
शहरात तृतीयपंथियांचा ‘प्राईड वॉक’
Advertisement

ह्युमॅनिटी फाऊंडेशनतर्फे आयोजन

Advertisement

बेळगाव : आम्ही समाजापासून वेगळे नाही. या समाजाचेच आम्हीही एक घटक आहोत. तुमच्याप्रमाणेच आम्हालाही सन्मानाने जगू द्या, अशी जनजागृती करत ह्युमॅनिटी फाऊंडेशन बेळगावतर्फे शहरात तृतीयपंथियांचा ‘प्राईड वॉक’ पार पडला. संचयनी सर्कल येथून सुरू झालेल्या या वॉकचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल या मार्गांवरून हा वॉक कुमार गंधर्व रंगमंदिर येथे पोहोचला. यावेळी बोलताना तृतीयपंथियांच्या नेत्या किरण बेदी म्हणाल्या, प्राईड वॉक हे आमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. आपला देश विविधतेत एकता हे सूत्र मिरवतो. त्यामुळे आम्हालासुद्धा समाजाने सन्मानाने वागविले पाहिजे, असे सांगितले. तानाजी यांनी शहरात 500 हून अधिक तृतीयपंथी आहेत. इतर नागरिकांप्रमाणे आम्हालाही सर्व सरकारी सुविधा व सोयी मिळावयास हव्यात, असे सांगितले. त्यानंतर कुमार गंधर्व रंगमंदिराच्या व्यासपीठावर तृतीयपंथियांचा मोठा फॅशन शो झाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.