बंगाल फुटबॉल संघाचा गौरव
वृत्तसंस्था / कोलकाता
2024 च्या फुटबॉल हंगामात संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या बंगाल फुटबॉल संघाचा खास गौरव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आला.
बंगालच्या फुटबॉल संघाने संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकून फुटबॉल क्षेत्रात नवा इतिहास घडविल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संघातील खेळाडूंचे तसेच प्रमुख प्रशिक्षक संजय सेन यांचे खास कौतुक केले. या कामगिरीबद्दल बंगाल फुटबॉल संघाला पश्चिम बंगालच्या शासनाकडून 50 लाख रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. बंगाल फुटबॉल संघाच्या या कामगिरीचे राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. संतोष फुटबॉल करंडक जिंकून बंगाल संघाने राज्यातील नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात बंगाल संघाने केरळचा 1-0 असा पराभव केला होता.