For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राईड हॉटेल्सच्या आयपीओला मंजुरी

06:12 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्राईड हॉटेल्सच्या आयपीओला मंजुरी
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

प्राईड हॉटेल्स या कंपनीचा लवकरच आयपीओ सादर होणार असून यासंदर्भातल्या अर्जाला बाजारातील नियामक सेबी यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये कंपनीने चांगले नाव कमाविले आहे. आयपीओकरीता कंपनीने बाजारातील नियामक संस्था सेबी यांच्याकडे रितसर कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. नुकतीच या अर्जाला सेबीने मंजुरी दिली आहे.

आयपीओबाबत...

Advertisement

गेल्या ऑक्टोबरमध्ये आयपीओकरीता कागदपत्र सेबीकडे सादर केले होते. 1 हजार कोटी रुपयांच्या या आयपीओ अंतर्गत 260 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जाणार आहेत. 39 दशलक्ष इक्विटी समभाग प्रवर्तकांकडून विक्री केले जाणार आहेत. बीएसई आणि एनएसई यावर कंपनीचे समभाग सूचिबद्ध होतील.

Advertisement
Tags :

.