For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मारुती सुझुकी गाड्यांच्या किंमती 20 हजारपर्यंत वाढणार

10:13 AM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मारुती सुझुकी गाड्यांच्या किंमती 20 हजारपर्यंत वाढणार
Advertisement

चार महिन्यांत तिसऱ्यांदा दरवाढ : ऑगस्टमध्ये विक्रमी विक्री

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडियाने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, याच महिन्यात निवडक कार मॉडेल्सच्या किमती 20,000 ने वाढणार आहेत. मारुतीने मे महिन्यापासून चार महिन्यांत पाहता तिसऱ्यांदा कार्सच्या दरात वाढ केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, वाहनांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आणि सतत वाढणाऱ्या महागाईच्या दबावामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे. मात्र, कोणत्या मॉडेलवर किती रुपयांची वाढ केली जात आहे, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मारुतीने गेल्या महिन्यात 2.19 लाख वाहने विकून विक्रम प्रस्थापित केला आहे.

Advertisement

खर्चवाढ तरीही ग्राहकांवर अंशत: भार

मारुती सुझुकीचे म्हणणे आहे की, गाड्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या (जसे की स्टील, धातू इत्यादी) किमती आणि महागाई सातत्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी या वाढलेल्या खर्चाचा भार सहन करत होती आणि किमती न वाढवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु आता जुन्या किमतीत गाड्या विकणे कंपनीला अवघड झाल्यामुळे खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा एक छोटासा भाग किमती वाढवून ग्राहकांवर टाकला जात आहे, जेणेकरून ग्राहकांच्या खिशावर जास्त भार पडणार नाही.

मारुतीची विक्रमी विक्री

किमती वाढूनही बाजारात मारुती सुझुकीच्या गाड्यांची मागणी कमी झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात कंपनीने एकूण 2.19 लाख वाहनांची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 21 टक्के जास्त आहे.

भारतातील विक्री: मारुतीची देशांतर्गत विक्री 29 टक्क्यांनी वाढून 1.85 लाख वाहनांवर पोहोचली. यापैकी, सर्वसामान्य जनतेने खरेदी केलेल्या प्रवासी कारची विक्री 35 टक्क्यांनी वाढून 1.76 लाख युनिट्सवर पोहोचली.

निर्यात: इतर देशांमध्ये निर्यात झालेल्या वाहनांची विक्री 7 टक्क्यांनी घटून 33,844 वाहनांवर आली.

‘इको’ चा 15 लाख विक्रीचा नवा विक्रम

मारुती सुझुकीच्या लोकप्रिय व्हॅन ‘इको’ने भारतात विक्रीचा मोठा विक्रम रचला आहे. जानेवारी 2010 मध्ये लॉन्च झाल्यापासून या गाडीचे 15 लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. हे वाहन छोटे व्यापारी, दुकानदार आणि मोठ्या कुटुंबांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

टाटाकडून 25,000 रुपयांची दरवाढ

टाटा मोटर्सनेही 1 सप्टेंबरपासून आपल्या प्रवासी गाड्यांच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. कंपनीने ही दरवाढ आपल्या संपूर्ण कार पोर्टफोलिओला लागू केली आहे, ज्यामध्ये पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी इंजिन असलेल्या गाड्या तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.