For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बेळगाव जिल्ह्यात उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित

10:34 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्यात उसाला प्रतिटन ३ ६०० रुपये दर निश्चित
Advertisement

उद्यापासून साखर कारखाने सुरू होणार; मंत्री सतीश जारकीहोळी यांची घोषणा

Advertisement

बेळगाव

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील दर निश्चितीचा तिढा अखेर तात्पुरता सुटला आहे. बेळगाव जिल्ह्यातील उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्यास सहमती दर्शविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Advertisement

पावसावर अवलंबून ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी या दराला सहमती दर्शविली आहे. इतर शेतकरी संघटनांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून, बैठकीत सर्वांनी या दराला मान्यता दिली आहे. त्यामुळे गुरुवारपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनकर्त्यांनी जेल भरो आंदोलन आणि पदयात्रा स्थगित करून साखर कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री जारकीहोळी यांनी केले.

राज्य सरकारच्या एसएपी (SAP) दराच्या मागणीबाबत वर्षभरानंतर फेरविचार करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रतिटन ३,६०० रुपयांचा हा दर केवळ बेळगाव जिल्ह्यापुरताच लागू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.