दुप्पट परताव्याचा बहाणा ; 80 लाखांची फसवणूक
कराड :
दुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल 80 लाख 50 हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. सात जणांच्या फसवणूकप्रकरणी अलाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर-काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आगा†शवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
दरम्यान, अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असून अनेक लोक पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागेल म्हणून किंवा समाजात पत जाईल म्हणून तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काले येथील अलाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा संशयित प्रमोद पाटील ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने या दोघांना विश्वासात घेतले असावे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचे प्रमोद पाटील याने त्या दोघांना सांगितले. यातून तुम्हालाही चांगले पैसे मिळतील असे सांगत त्याने त्या तांबोळी व सारडा यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या गुंतवणुकीची विश्वासार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी कऊन देण्याचेही प्रमोद पाटील याने कबूल केले. त्यानुसार अलाउद्दीन तांबोळी यांनी मार्च 2022 मध्ये साडेदहा लाख लाख रुपये तर त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा यांनी 21 लाख रुपये प्रमोद पाटील याला दिले. मात्र, 2022 पासून 2024 पर्यंत प्रमोद पाटील याने दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे अलाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार पैशाची मागणी करूनही प्रमोद पाटील याने त्यांना टाळले.
तसेच शेअर मार्केट पडले आहे. थोड्या दिवसांनी पैसे देतो, असे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अलाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांच्यासह प्रमोद पाटील याने हिना चेतन मोठा यांचे 3 लाख, जयकर जयसिंग पाटील यांचे 3 लाख, डॉ. नितीन नरेंद्रकुमार जाधव यांचे 10 लाख, गणेश पाटील यांचे 10 लाख, राजाराम पांडुरंग माने यांचे 15 लाख 50 हजार असे एकूण 70 लाख 50 हजार ऊपये घेतले असल्याचे अलाउद्दीन तांबोळी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
प्रमोद पाटील याने दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे तसेच सर्वांची मिळून सुमारे 70 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अलाउद्दीन तांबोळी यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक माऊती चव्हाण तपास करीत आहेत.