For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रतिष्ठेच्या अॅशेस सिरीजचे वेळापत्रक जाहीर

06:48 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रतिष्ठेच्या अॅशेस सिरीजचे वेळापत्रक जाहीर
Advertisement

पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये रंगणार सामने

Advertisement

वृत्तसंस्था/ .सिडनी

यंदाच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाला यावेळी अॅशेस मालिका आयोजित करायची असून बोर्डाने या मालिकेचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर केले आहे. 2025-26 च्या अॅशेस मालिकेला पर्थ येथून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल. विशेष म्हणजे, 43 वर्षांनंतर या ठिकाणी प्रथमच अॅशेस मालिकेतील पहिला सामना आयोजित होईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सरकारच्या सहकार्याने मालिकेच्या तारखांची घोषणा बुधवारी पर्थमधील स्कारबोरो बीच येथे एका कार्यक्रमात केली.

Advertisement

21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पर्थ कसोटीने पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेची सुरुवात होणार आहे. यानंतर, दुसरा कसोटी सामना गाबामध्ये खेळवला जाईल. जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून हा सामना 8 डिसेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे. यानंतर ख्रिसमस कसोटी सामना होणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांना सुमारे एक आठवड्याचा ब्रेक मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्येही ब्रेक आहे. तिसरा कसोटी सामना 17 ते 21 डिसेंबर दरम्यान अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होईल. जो 30 डिसेंबरपर्यंत खेळला जाईल. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना हा नवीन वर्षाचा कसोटी सामना असेल. जो 4 जानेवारी ते 8 जानेवारी 2026 पर्यंत सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर होईल.

Advertisement
Tags :

.