For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटाच्या समभाग विक्रीमुळे बाजारावर दबाव

06:39 AM Aug 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटाच्या समभाग विक्रीमुळे बाजारावर दबाव
Advertisement

सेन्सेक्स 188 तर निफ्टी 35.75 अंकांनी नुकसानीत: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या

Advertisement

चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात  घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले. दरम्यान देशांतर्गत शेअर बाजारात मंदी दिसून आली. बाजाराचा प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर टाटा ग्रुपचे समभाग सर्वाधिक चर्चेत राहिलेत.

त. भा. वृत्तसंस्था मुंबई 

Advertisement

याशिवाय, गोदरेज ग्रुपच्या शेअर्ससह चांगल्या कामगिरी करणाऱ्या समभागांमध्ये हालचाल दिसून आली. तथापि, बाजार बंद होण्यापूर्वी मोठ्या खरेदीमुळे बाजारात चांगली सुधारणा दिसून आली. प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेरीस बीएसई सेन्सेक्स 187.90 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 77,966.35 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 35.75 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 24,435.95 वर बंद झाला आहे.

टाटा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर, टीसीएसचा शेअर दिवसभरात 5 टक्क्यांहून अधिक घसरून 3.9 टक्क्यांनी खाली बंद झाला. निफ्टीमध्येही टीसीएस सर्वाधिक घसरला. याशिवाय, टाटा स्टील आणि टाटा कंझ्युमरचे शेअर्सही 1.5 टक्क्यांपर्यंत घसरले. दुसरीकडे, हिंडाल्को, एसबीआय, जिओ फायनान्शियलचे शेअर्स सर्वाधिक वाढले. क्षेत्रीय कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी पीएसयू निर्देशांक 2 टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर आयटी निर्देशांक 1.5 टक्क्यांहून अधिक घसरला.

देशांतर्गत बाजारपेठ का कोसळली?

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, भारत आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सतर्क आहे. कारण जागतिक अनिश्चिततेच्या काळात आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. इतर आशियाई बाजारपेठांमध्ये सकारात्मक चित्र असूनही, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवरही परिणाम झाला.

गुंतवणूकदारांची खरेदी आणि विक्री

मंगळवारी भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदार म्हणजेच एफआयआय  निव्वळ खरेदीदार होते. उपलब्ध माहितीनुसार, एफआयआयनी 11 ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी खरेदी केली. मंगळवारी, विदेशी गुंतवणूकदारांनी 258 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्याच वेळी, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच डीआयआयंनी 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. टाटा समूहातील सुरु असलेल्या घडामोडींचा प्रभाव हा आगामी काळातही बाजारातील कामगिरीवर होणार का नाही हे पहावे लागणार आहे. मात्र कंपन्यांचे तिमाही अहवाल व अन्य घडामोडींच्या मदतीने बाजारात सकारात्मक संकेत राहणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.