For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

देशाच्या विदेशी चलनसाठ्यावर दबाव सुरुच

06:22 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशाच्या विदेशी चलनसाठ्यावर दबाव सुरुच
Advertisement

23 ऑक्टोबरच्या आठवड्यात 1.269 अब्ज डॉलरची घसरण

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विदेशी चलनसाठ्यामध्ये घसरणीचा सिलसिला सुरुच राहिला आहे. 23 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा 1.269 अब्ज डॉलर्सने घसरत 719.748 अब्ज डॉलरवर आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या आधीच्या 16 ऑक्टोबरच्या आठवड्यात चलनसाठ्यामध्ये 5.011 अब्ज डॉलरची घसरण झाली होती. 23 ऑक्टोबरच्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्ता 1.358 अब्ज डॉलर्स इतकी वाढली. या आधीच्या आठवड्यात 5.758 अब्ज डॉलरची मोठी घसरण मालमत्तेत दिसली होती.

Advertisement

34 हजार कोटी बाजारातून काढले

भारतीय शेअरबाजारामध्ये विदेशी गुंतवणुकदारांनी आपली गुंतवणूक काढण्याचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. ऑक्टोबर महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी एकंदर 34843 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणुकदारांनी सलग दुसऱ्या महिन्यामध्ये समभागांची विक्री केली आहे. इतर देशांच्या बाजारांमध्ये गुंतवणुकदारांनी आपली गुंतवणूक वरील दोन महिन्यांमध्ये वळविली असल्याचेही पाहायला मिळाले. यामुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव पहायला मिळाला. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्याचप्रमाणे व्याजदर सुद्धा उच्चांकीदरावर होते. सोबत कंपन्यांचे तिमाही निकालसुद्धा अपेक्षेप्रमाणे न लागल्यामुळे गुंतवणुकदारांचा मूड खराब झाला होता.

6300 कोटी गुंतवले

तरीही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 26 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान विदेशी गुंतवणुकदारांनी जवळपास 6300 कोटी रुपये समभाग खरेदी करून गुंतवले होते. याआधीच्या 23 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यामध्ये 2700 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते. 2026 मध्ये आतापर्यंत पाहता विदेशी गुंतवणुकदारांनी 2.95 लाख कोटी रुपये शेअर बाजारातून काढून घेतले असल्याचे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमीटेड यांनी सांगितले. ऑक्टोबरच्या आधी सप्टेंबर महिन्यात 35861 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले होते. जुलैमध्ये 20200 कोटी, ऑगस्ट 29631 कोटी इतकी रक्कम गुंतवणुकदारांनी गुंतवली होती.

Advertisement
Tags :

.