ऑटो समभागांमध्ये दबाव
06:41 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई:
Advertisement
अमेरिका -इराण युद्धामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच होरपळताना दिसतो आहे. या युद्धाच्या वणव्यामुळे शेअर बाजारात ऑटो कंपन्यांना सुद्धा झळ सोसावी लागते आहे. दबावामुळे ऑटो कंपन्यांचे समभाग सोमवारी 9 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. टाटा मोटर्सचे समभाग 9 टक्के घसरणीसह 389 या भावावर तर अशोक लेलॅण्डचे समभाग 5 टक्के कमकुवत होत 155 रुपयांवर बीएसईवर इंट्राडे दरम्यान घसरले होते. याच दरम्यान बीएसई सेन्सेक्स आणि बीएसई ऑटो निर्देशांक 1.6 टक्के, 1.9 टक्के घसरणीत होता. टाटा मोटर्सचा समभाग 24 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
Advertisement
Advertisement