भगवान जगन्नाथाचे राष्ट्रपतींनी घेतले दर्शन
07:00 AM Nov 11, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
ओडिशाच्या दौऱयावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म
Advertisement
पुरी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाच्या पुरीमध्ये भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी सुमारे 2 किलोमीटरची पायपीट केली आहे. राष्ट्रपती मुर्मू या गुरुवारी ओडिशाच्या दौऱयावर होत्या. भुवनेश्वर येथे राज्यपाल गणेशी लाल, मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतींना त्यांच्या पहिल्या ओडिशा दौऱयानिमित्त गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशातील मयूरभंज जिल्हय़ातील आहेत. आदिवासी संथाल कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. मुर्मू यांनी एक शिक्षिका म्हणून स्वतःच्या कारकीर्दीत सुरुवात केली होती. त्यांनी राज्याच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले होते.
Advertisement
Advertisement
Next Article