‘प्रचंड’ हेलिकॉप्टरमधून राष्ट्रपती मुर्मूंचे उड्डाण
भारत-पाक सीमेवर सह-वैमानिक होत रचला इतिहास
वृत्तसंस्था/ जैसलमेर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये स्वदेशी हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंडमधून उड्डाण केले आहे. राष्ट्रपतींनी भारत-पाकिस्तान सीमेनजीक प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये सहवैमानिक म्हणून उड्डाण करत इतिहास रचला आहे. स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरमध्sय सहवैमानि होत उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
एलसीएच प्रचंडने जैसलमेर येथील वायुदलाच्या तळावरून उड्डाण केले. उड्डाणापूर्वी कॅप्टनने राष्ट्रपतींना माहिती दिली. हिरव्या रंगाचा गणवेश अणि हेल्मेट परिधान केलेल्या राष्ट्रपतींनी प्रस्थान करण्यापूर्वी कॉकपिटमधून हात उंचावून अभिवादन केले आहे.
राष्ट्राच्या नावाने संदेश
भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर राष्ट्रपतींनी उड्डाणादरम्यान कॉकपिटमधून राष्ट्राच्या नावाने संदेशही दिला. प्रचंड हेलिकॉप्टर आत्मनिर्भरतेचे एक सशक्त प्रतीक आहे. सद्यवेळेत मी जैसलमेर जिल्ह्यावरून उड्डाण करत आहे. आमच्या शूर सैनिकांना शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त करते, तुम्हाला माझा सलाम, जय हिंद, जय भारत असे मुर्मू यांनी स्वत:च्या संदेशात नमूद केले आहे. हे हेलिकॉप्टर उ•ाण सुमारे 25 मिनिटांपर्यंत चालले. हेलिकॉप्टर पोखरण फायरिंग रेंजवरून गेले, जेथे भारतीय वायुदलाने शुक्रवारी संध्याकाळी ‘वायुशक्ती’ नावाचे अग्निशक्ति प्रदर्शन आयोजित केले आहे.
राष्ट्रपतींची इतिहास रचणारी कामगिरी
प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत. तर मागील वर्षी त्यांनी राफेल लढाऊ विमानातून उ•ाण केले होते. तर एप्रिल 2023 मध्ये त्यांनी सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला होता.
प्रचंड हेलिकॉप्टर
एलसीएच प्रचंड हे भारताचे पहिले स्वदेशी रुपाने डिझाइन आणि विकसित करण्यात आलेले कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे, हे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने निर्माण केले आहे. प्रगत एवियोनिक्स, स्टील्थ वैशिष्ट्या, नाइट-अटॅक क्षमता आणि एअर-टू-ग्राउंड आणि एअर-टू-एअर क्षेपणास्त्रs, रॉकेट तसेच 20 मिमी गनसमवेत शक्तिशाली शस्त्रास्त्रांनी युक्त एलसीएच भारतीय वायुदलाच्या युद्धक्षमतेला उल्लेखनीय स्वरुपात वाढविणारे आहे.