For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हैसूर दौऱ्यावर

10:50 AM Sep 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हैसूर दौऱ्यावर
Advertisement

बेंगळूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी म्हैसूर दौऱ्यावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी त्यांचे मंडकळ्ळी विमानळावर विशेष विमानाने आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी नैमिषम कॅम्पसमध्ये अखिल भारतीय वाक् आणि श्रवण संस्थेच्या हिरक महोत्सवात सहभागी झाल्या. रात्री 8 वाजता चामुंडी टेकडी येथे मंदिरात चामुंडेश्वरी देवीची विशेष पूजा केली. मंगळवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हैसूर राजवाड्याला भेट देतील. याप्रसंगी त्या वडेयर राजघराण्याच्या प्रमोदादेवी वडेयर यांच्या कुटुंबीयांसोबत नाश्ता करतील. त्यानंतर त्यांचे दिल्लीला प्रस्थान होईल. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारपर्यंत राजवाडा परिसरात सर्वसामान्याच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.