For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रुसलान’चा ट्रेलर सादर

06:34 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रुसलान’चा ट्रेलर सादर
Advertisement

आयुष शर्माचा अॅक्शन अवतार

Advertisement

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानच्या बहिणीचा पती अभिनेता आयुष शर्माचा चित्रपट ‘रुसलान’ चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आता निर्मात्यांनी जारी केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दीर्घकाळानंतर आयुष एखाद्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसून येणार आहे. सलमानने याचा ट्रेलर शेअर करत स्वत:चा रिह्यू दिला आहे. करण ललित भूटानी यांच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट ‘रुसलान’चा ट्रेलर आयुषने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलच्रमध्ये आयुषसोबत सोनाक्षी सिन्हाचा प्रियकर जहीर इक्बाल देखील कॅमियो करताना दिसून येणार आहे. आयुष रुसलनाची कठोर मेहनत, प्रयत्न आणि समर्पण पाहिले जाऊ शकते. काहीही होऊ दे, तू तुझे सर्वोत्तम योगदान देत रहा, कठोर मेहनतीचे फळ अवश्य मिळेल असे सलमानने ट्रेलर शेअर करत म्हटले आहे.  आयुषसोबत चित्रपटात सुश्री मित्रा आणि दक्षिणेतील अभिनेते जगपति बाबू, सुनील शेट्टी देखील दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती केके राधामोहन यांनी केली आहे. हा चित्रपट  26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.