For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘हीरामंडी’चा ट्रेलर सादर

06:59 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘हीरामंडी’चा ट्रेलर सादर
Advertisement

संजय लीला भन्साळी यांची वेबसीरिज

Advertisement

संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतीक्षित सीरिज ‘हीरामंडी’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. यात नृत्यांगनांशी निगडित कहाणी असली तरीही यात इंग्रजांकडून झालेले अत्याचार आणि त्याविरोधात देण्यात आलेल्या लढ्याची किनारही लाभली आहे. ही सीरिज 1 मेपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शर्मिन सहगल, संजीदा शेख, फरदीन खान, ताहा शाह बदूशा, शेखर सुमन आणि अध्ययन सुमन यांनी भूमिका साकारली आहे. अत्यंत असाधारण महिलांच्या आकांक्षा आणि संघर्षाची कहाणी यात दर्शविण्यात आली आहे. ही माझ्या नव्या प्रवासाचा मुक्काम दर्शविते. नेटफ्लिक्सने आमचे कहाण्यांबद्दलचे प्रेम ओळखले आहे. तसेच आमच्या सीरिजला अत्यंत वेगळी आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता देखील नेटफ्लिक्समध्ये असल्याचे उद्गार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी काढले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.