For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक रक्तदान दिनानिमित्त पथनाट्याचे सादरीकरण

06:18 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागतिक रक्तदान दिनानिमित्त पथनाट्याचे सादरीकरण
Advertisement

केएलई ब्लड बँक-एनएसएस विभाग-डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने केएलई डॉ. प्रभाकर कोरे ब्लड बँक-एनएसएस विभाग तसेच बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नाथ पै सर्कल व टिळक चौक येथे पथनाट्या सादर करण्यात आले.

Advertisement

डॉ. एम. बी. रामण्णावर यांनी रक्तदान किती महत्त्वाचे आहे, त्याबद्दलच्या गैरसमजुतींबद्दल जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

पोवाड्याने पथनाट्याला प्रारंभ झाला. त्यानंतर अपघातात सापडलेल्या एका तरुणीला ओ निगेटिव्ह रक्ताची नितांत गरज आहे. परंतु ब्लड बँकेमध्ये या गटाचे रक्त उपलब्ध नसते. तरुणीची आई अनेकांना रक्तदानासाठी विनंती करते. परंतु कोणीही पुढे न आल्याने त्या तरुणीचा मृत्यू होतो, अशी घटना पथनाट्यात दाखविण्यात आली.

तसेच ब्लड बँकेमध्ये योग्य रक्तगट न मिळाल्याने एक व्यक्ती रक्तदानासाठी पुढे येते. परंतु रक्तदान झाल्याक्षणी परत त्वरित घरी आणून सोडण्याची अट घालते. याचे कारण असे की, आदल्या दिवशी त्या व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो व त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्या व्यक्तीला घरी यावयाचे असते. ही वास्तव घटना अनिल चौधरी यांनी सांगितली.

एकूण पथनाट्यामधून रक्तदानाबद्दल बरीच जागृती झाली व चार रक्तदात्यांनी रक्तदानाची शपथ घेतली. याप्रसंगी केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. रमेश जुट्टण्णावर, बसवराज सोंटेन्नावर, नागेश दुकानदार, नितीन कपिलेश्वर, एनएसएस अधिकारी डॉ. संदीप सगरे, डॉ. प्रशांत, आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. सुहासकुमार शेट्टी, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.