‘स्कोडा कायलाक’चे सादरीकरण
वृत्तसंस्था/ मुंबई
स्कोडा कायलाकने भारतीय बाजारात आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलाक सादर केली आहे. झेक रिपब्लिक कंपनीची भारतातील सर्वात लहान एसयूव्ही राहणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. यामध्ये त्याची रचना कुशकपासून
प्रेरित आहे. केबिनमध्ये काळी आणि राखाडी थीम असून सर्वत्र सिल्व्हर आणि क्रोम अॅक्सेंट आहेत.
कायलाक 10.1-इंच टचक्रीन, हवेशीर फ्रंट सीट्स आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. याशिवाय, सब-4 मीटर एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज मानक, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी ट्रॅक्शन नियंत्रण यांसारखी वैशिष्ट्यो आहेत. प्रास्ताविक प्रारंभिक किंमत रु. 7.89 लाख सब-4 मीटर एसयूव्ही चार प्रकारांमध्ये देण्यात आली आहे. यात क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीजचा समावेश आहे.
सदरच्या गाडीचे बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर fिडलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून उपलब्ध होणार असल्याची कंपनीची माहिती आहे. भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर. ती टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ, निसान मॅगनेट आदींसोबत स्पर्धा करणार आहे.