2 आयपीओंचे होणार सादरीकरण
प्रोटीन इगोव्ह टेक्नॉलॉजी, एएसके ऑटोटीव्हचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या आठवड्यामध्ये दोन कंपन्यांचे आयपीओ शेअरबाजारामध्ये लॉन्च होणार आहेत. प्रोटीन इगोव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एएसके ऑटोमोटिव्ह लिमिटेड यांचे आयपीओ येत्या आठवड्यामध्ये बाजारात दाखल होणार आहेत.
प्रोटीन इगोव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांचा आयअीपो 6 नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी खुला झाला असून 8 तारखेपर्यंत यामध्ये गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. कंपनी या आयपीओअंतर्गत 490 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. सदरच्या कंपनीचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई)17 नोव्हेंबरला सूचीबद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीओकरिता कंपनीने समभागाची किंमत 752-792 प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर एका लॉटसाठी अर्ज करता येणार आहे, याकरिता 14 हजार 256 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
`
एएसके ऑटोमॅटिव्ह लिमिटेड यांचा आयपीओ 7 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून 9 नोव्हेंबरला तो बंद होणार आहे. कंपनीचा समभाग मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारमध्ये (एनएसई) 20 नोव्हेंबरला सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आयपीओअंतर्गत कंपनी 834 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. समभागाची किमत 268-282 रुपये प्रति समभाग इतकी ठेवण्यात आली आहे. दुचाकीसाठी ब्रेक शू आणि अॅडव्हान्स ब्रेकिंग प्रणालीचे काम एएसके ऑटोमोटिव्ह ही कंपनी करते.