महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वळीव पावसाची राज्यात हजेरी

12:40 PM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजही शक्यता, यलो अलर्ट जारी, पारा वाढण्याची शक्यता,पावसाळ्याला लवकर प्रारंभ होण्याचा अंदाज

Advertisement

पणजी : राज्यातील तापमानात गुरुवारी किंचित घट दिसून आली. पारा 35 डि. सें. एवढा राहिला. मात्र आज पुन्हा एकदा पारा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारनंतर गोव्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. राजधानी पणजीपर्यंत पाऊस पोहोचला. आजही अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसाळी मोसम सुरू होण्यास आता केवळ 14 दिवस शिल्लक राहिले असून गुरुवारी गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. वाळपई, केरी, सांखळी, डिचोली, आमोणे, माशेल, फोंडा, सांगे, जुने गोवे, पणजी, म्हापसा, पेडणे आदी भागात गुरुवारी जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने आज, उद्या व रविवारीदेखील अनेक भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यासाठी यलो अलर्टही जारी केला आहे. दरम्यान, गोव्यात पडलेल्या वळवाच्या पावसाने चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. मार्चपासून आतापर्यंत फोंडा तालुक्यात 6 इंच पाऊस पडलेला आहे. पणजीत 4 इंच, जुने गोवे 3 इंच, सांखळीत 1 इंच, दाबोळी 2.5 इंच, मुरगाव 1.75 इंच, केपे 2 इंच व सांगेमध्ये 1 इंच पावसाची नोंद झालेली आहे.यंदा पावसाळ्याला लवकर सुरुवात होईल, असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. गुरुवारी दुपारनंतर सर्वत्र अर्धा ते 1 तास पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला व उन्हाच्या भयंकर झळांनी हैराण झालेल्या गोमंतकीय नागरिकांना दिलासा मिळाला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article