For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

06:07 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
Advertisement

► प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने शहरासह ग्रामीण भागामध्ये हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. शहरावर दुपारी काही प्रमाणात सरी कोसळल्या. तसेच ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे ही मान्सूनचीच चाहुल असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.

गेल्या दोन महिन्यांपासून बेळगाव शहर उष्म्याने हैराण झाले होते. मध्यंतरी जोरदार वळीव बरसला. मात्र उष्मा काही कमी झाला नव्हता. शनिवारी मात्र ढगाळ वातावरण आणि हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झाला होता. केरळमध्ये दमदार पाऊस कोसळत असून अरबी समुद्रामध्ये मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Advertisement

दरवर्षी मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होते. यावर्षी वेळेवर मान्सून येईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले होते. अजून जवळपास दहा ते बारा दिवस अवधी आहे. त्यामुळे हा मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे रेनकोट आणि छत्रीची तजबीज करूनच नागरिक घराबाहेर पडत होते.

या पावसामुळे शहरातील छत्री, रेनकोट दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. जणू मान्सूनलाच सुरुवात झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे बरेच जण आताच या वस्तू खरेदी करण्यासाठी धडपडत होते. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मशागती कामाला मात्र अडचण निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.