महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

के-9 वज्र तोफा खरेदी करण्याची तयारी

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर संरक्षण प्रकल्पांवर जोर : लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मिती प्रस्तावाला मिळणार मंजुरी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर के-9 वज्र स्वयंचलित होवित्झर तोफ खरेदी आणि मेक इन इंडिया अंतर्गत लढाऊ विमानांचे इंजिन तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. या सर्व प्रकल्पांना मार्च महिन्यात मंजुरी मिळणे अपेक्षित होते, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे हे प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी प्रलंबित राहिले आहेत. के-9 वज्र होवित्झर, सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानाचे इंजिन आणि अनेक संशोधन आणि विकास प्रकल्प देखील कॅबिनेट समितीच्या अजेंड्यात सामील आहेत अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

एचएएलकडून इंजिननिर्मिती

सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानाचे इंजिन हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून तयार करण्यात येणार आहे. तसेच या इंजिन्सच्या निर्मितीसाठी एकूण 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते. एचएएलकडून सुखोई-30 एमकेआय विमानांच्या इंजिन्सची निर्मिती ओडिशाच्या कोरापूटमध्ये करण्यात येणार असल्याचे समजते. भारतीय वायुदलाला लढाऊ विमानांच्या  इंजिन्ससाठी अन्य देशांवर निर्भर रहावे लागत होते. परंतु आता कोरोना महामारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या स्थितीमुळे लढाऊ विमानांच्या इंजिन्सची निर्मिती देशातच करणे आवश्यक ठरले आहे.

आणखी 100 तोफा खरेदी होणार

केंद्र सरकार भारतीय सैन्याची मागणी पाहता आणखी 100 के-9 वज्र एसपी होवित्झर खरेदी करण्याच्या प्रस्तावावरही विचार करू शकते. भारतीय सैन्याने मैदानी आणि वाळवंटी भागात स्वत:च्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रारंभी या तोफांना स्वत:च्या ताफ्यात सामील केले होते, परंतु आता सैन्याने लडाख क्षेत्रात याचा यशस्वीपणे वापर केला आहे. डीआरडीओचे अनेक संरक्षण संशोधन आणि विकास प्रकल्पही देखील सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाइपलाइनमध्ये आहेत. संरक्षण मंत्रालय, सैन्य, नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने देखील 100 दिवस आणि 6 महिन्यांच्या अजेंड्यात सामील करण्यासाठी सरकारला स्वत:चे प्रस्ताव दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच यावर त्वरित काम सुरू होऊ शकेल असे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article