For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ड्रोन-एआयपासून अंतराळापर्यंत युद्धासाठी दक्ष!

06:37 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ड्रोन एआयपासून अंतराळापर्यंत युद्धासाठी दक्ष
Advertisement

नव्या हवाई दल प्रमुखांचा ‘वायू मंत्र’ : हवाई दल सज्ज असल्याचे संकेत

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाचे नवनियुक्त प्रमुख एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी ड्रोन-एआयपासून अंतराळापर्यंत कोणत्याही पातळीवर लढण्यासाठी भारत तयार असल्याचे प्रतिपादन रविवारी केले. पुढील दशकात भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हवाई दलाला तयार करणे, तसेच सर्वकाळ युद्ध लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी त्याची सज्जता सुनिश्चित करणे, हे त्यांचे प्राधान्य असल्याचेही स्पष्ट केले.

Advertisement

भारतीय हवाई दल नेहमीच दक्ष, सज्ज आणि आपल्या निश्चयात दृढ असल्याचे  आश्वासन नव्या हवाई दल प्रमुखांनी देशाला दिले. हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एअर चीफ मार्शल दीक्षित यांनी ‘वायू’ या शब्दातील अक्षरांच्या माध्यमातून आपले प्राधान्यक्रम स्पष्ट केले. युद्ध लढणे आणि जिंकणे ही हवाई दलाची जबाबदारी आहे, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वासार्ह हवाई शक्तीद्वारे संघर्ष टाळणे आणि शत्रूला तसे करण्यापासून रोखणेही महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.

दक्षता-सज्जतेवर भर

‘वायू’मधील (न्न्Aभ्ळ)‘व्ही’ हे अक्षर दक्षता आणि सज्जतेचे प्रतीक आहे. प्रत्येक स्क्वाड्रन, प्रत्येक रडार, प्रत्येक हवाई संरक्षण युनिट आणि प्रत्येक हवाई योद्धा कोणत्याही क्षणी तात्काळ कारवाईसाठी सज्ज असला पाहिजे. हवाई दलाची लढाऊ क्षमता स्वीकारार्ह पातळीवर पुनर्स्थापित करणे हे देखील एक महत्त्वाचे कार्य असेल, असे ते म्हणाले. ‘वायू’मधील ‘ए’ हे आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. तर ‘वाय’ हे ‘युक्ती’चे प्रतीक असल्याचे सांगत कल्पकता आणि नवीन उपाय शोधण्याची क्षमता असा होतो. वायुमधील ‘यू’ हे अक्षर प्रयत्नांची एकता दर्शवते असे सांगत नियोजनाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून इतर दलांसोबत एकत्रित काम केल्यावर हवाई शक्तीचा सर्वाधिक प्रभाव पडतो, असे त्यांनी ‘वायू’ चे महत्त्व अधोरेखित केले.

Advertisement
Tags :

.