महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मल्ल्या, नीरव मोदी, संजय भंडारीला लंडनमधून आणण्याची तयारी

06:46 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईडी, सीबीआय, एनआयएचे पथक जाणार : विदेश मंत्रालयाचा मोहिमेत सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

फरार गुन्हेगारांच्या विरोधात कारवाईवरून केंद्र सरकार अॅक्शनमोडमध्ये आले आहे. भारत सरकार फरार झालेल्या गुन्हेगारांना लंडनमधून आणण्याची तयारी करत आहे. बंद पडलेल्या किंगशिफर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या, हीरेव्यापारी नीरव मोदी आणि शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी यांचा या गुन्हेगारांमध्ये समावेश आहे. या गुन्हेगारांना मायदेशी परत आणण्यासाठी ईडी, सीबीआय आणि एनआयएचे पथक लंडनला जाणार आहे.

ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसोबत तिन्ही तपास यंत्रणांच्या टीमची बैठक होणार असून यात विदेश मंत्रालयाचा एक वरिष्ठ अधिकारीही सामील असणार आहे. ही बैठक लंडनमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीदरम्यान अधिकारी लंडनमध्ये असलेल्या फरार गुन्हेगारांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्ता तसेच बँकिंग व्यवहाराविषयी माहिती मागू शकतात. या घटनाक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांनी ब्रिटन तसेच इतर देशांमध्ये फरार गुन्हेगारांच्या असलेल्या संपत्तीची ओळख पटविली जात असल्याचे सांगितले आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यात परस्परांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी म्युच्युअल लीगल असिस्टेंस ट्रीटी (एमएलएटी) आहे. या कराराच्या अंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगारांसंबंधी दुसऱ्या देशाकडून माहिती प्राप्त केली जाऊ शकते.

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संजय भंडारी यांनी ब्रिटनमधून आणले जाणार आहे. तिघांनीही स्वत:चे भारताला होणारे प्रत्यार्पण रोखण्यासाठी लंडनच्या न्यायालयात धाव घेतली आहे. तर ईडीने या तिन्ही गुन्हेगारांच्या भारतातील संपत्ती जप्त केल्या आहेत. विजय मल्ल्या आणि नीरव मोदीची हजारो कोटींची संपत्ती विकून बुडविलेल्या कर्जाची रक्कम देखील वसूल करण्यात आली आहे.

2016 मध्ये विदेशात पलायन

विजय मल्ल्या 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळाला होता. किंगफिशर एअरलाइन्सला अनेक बँकांकडून देण्यात आलेल्या 9 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी विजय मल्ल्या भारतात वाँटेड आहे. तर नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. संजय भंडारी हा एका शस्त्रास्त्र खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#socailmedia
Next Article