For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी मनपा निवडणुकीची तयारी सुरु

01:01 PM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजी मनपा निवडणुकीची तयारी सुरु
Advertisement

प्रभागांच्या पुनर्रचनेचा मसुदा जारी : आक्षेपांसाठी 29 जानेवारीची मुदत 

Advertisement

पणजी : पणजी महानगरपालिकेच्या मार्च 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी सरकारने सुरु केली असून शहर विकास खात्याने प्रभागांचा पुनर्रचना मसुदा जारी केला आहे. त्यावर आक्षेप, सूचना, दुरुस्ती मागवण्यात आल्या असून त्याकरिता 29 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शहर विकास खात्याने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यात पणजी शहरातील मनपाच्या एकूण 30 प्रभागांचा पुनर्रचना मसुदा समाविष्ट करण्यात आला असून तो जनतेसाठी खुला आहे. तिसवाडी मामलेदार कार्यालय व पणजी मनपा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत त्याची पहाणी करण्याची मुभा असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी तो मसुदा उपलब्ध असणार नाही असे परिपत्रकातून कळवले आहे.

मोन्सेरात गटाची तयारी सुरु

Advertisement

दरम्यान, या निवडणुकीत उतरण्याची तयारी काही विद्यमान नगरसेवक सेविकांनी तसेच नवीन उमेदवारांनी सुरु केली आहे. सध्या पणजी मनपावर वर्चस्व असलेले पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काही नवीन उमेदवारांची चाचपणी चालू केली आहे. ते आपला गट पणजी मनपा निवडणुकीत उतरवणार आहेत.

सर्वांचे लक्ष उत्पल पर्रीकरांकडे

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे देखील आपला गट तयार करुन पणजी मनपा निवडणुक रिंगणात पडणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. तसे झाले तर ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. भाजपा विरुद्ध भाजप अशी रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वांचे लक्ष पर्रीकर यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

Advertisement
Tags :

.